पुणे

पोलीस भरतीच्या परीक्षेत कॉपी केल्याने पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे; दौंड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पोलीस भरतीत गैरप्रकार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : देश सेवा आणि समाजसेवा करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आर्मी, हवाई दल, नौदला बरोबरच सशस्त्र पोलीस शिपाई होण्याकडे अलीकडे अनेक तरुणांचा कल असल्याचे मागील विविध शिपाई भरतींमधून दिसून येते. यासाठी अनेक तरुण जीवतोड मेहनतही घेतात. मात्र, भरती गैरप्रकार अवलंबल्यावर पोलीस शिपाई होण्याचे स्वप्न तर भंगतेच मात्र त्यामुळे जेलची हवाही खावी लागते. असाच धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंड येथून समोर आला आहे. सशस्त्र पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान तीन परीक्षार्थींनी कॉपी केल्याचे आढळून आल्याने त्यांचे सशस्त्र पोलीस शिपाई होण्याचे स्वप्न भंगले असून त्यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निलेश अशोकराव धुमाळ (वय ३७ वर्षे पोलीस नाईक ब.नं.६९६ व्यवसाय नोकरी रा.अस.आर.पी.एफ. ग्रुप नंबर ५,३०० क्वार्टर रूम नंबर १२/२ दौंड ता-दौंड जि. पुणे.) यांच्या फिर्यादी वरून प्रदिप आबासाहेब गदादे ( चेस्ट नंबर ८८८२ रा.बेनवडी ता. कर्जत जि.अहमदनगर) सुदर्शन उत्तमराव बोरूडे (चेस्ट नंबर ८८८५ रा. श्रीगोंदा ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर) आणि सतिश शिवाजी जाधव (चेस्ट नंबर ८८८७ रा. हिरडगाव ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर) या तीन परीक्षार्थींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २३ जुलै २०२३ रोजी सशस्त्र पोलीस शिपाई भरती लेखीपरिक्षा २०२१ राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५ दौंडचे वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी विद्यालय दौंड, येथील वर्ग क्रमांक १८ मध्ये परिक्षा देण्यासाठी आलेले उमेदवार प्रदिप गदादे, सुदर्शन बोरूडे, सतिश जाधव या तिघांनी संगमताने सशस्त्र पोलीस शिपाई भरती लेखी परिक्षा २०२१, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.५ दौंड ता. दौंड जि. पुणेचे पोलीस भरती लेखी परिक्षा मध्ये पास होवून नोकरी मिळवण्यासाठी कॉपी करून शासनाची फसवणूक करीत असताना आढळून आले. या प्रकरणी वरील तिघांविरोधात फिर्यादी पोलीस नाईक निलेश धुमाळ यांनी सरकारच्या वतीने कायदेशीर फिर्याद दिली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी राऊत करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button