गुन्हेगारीपुणे

Pune Crime News | ‘इन्स्टाग्राम’ वरील ओळख पडली महागात, सायबर चोरट्यांचा पुण्यातील महिलेला सहा लाखांचा गंडा

पुणे : daksh police news – Pune Crime News | ‘इन्स्टाग्राम’वर (Instagram) अनोळखी व्यक्तीशी मैत्री एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. सायबर चोरट्याने (Cyber Thief) महिलेला महागडे गिफ्ट पाठवल्याचे सांगून कस्टम चार्ज 6 लाख 34 हजार भरण्यास सांगून ऑनलाइन गंडा (Cheating Fraud Case) घातल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत कोंढवे धावडे येथील 44 वर्षाच्या महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी Gilbert Andrew1010 या इन्स्टाग्राम अकाऊंट धारकावर आयपीसी 419, 420, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान महिलेच्या घरी ऑनलाईन घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या गृहिणी आहेत. त्यांची फेब्रुवारी 2022 मध्ये ‘इन्स्टाग्राम’वर एका व्यक्तीशी ओळख झाली. त्या व्यक्तीने ओळख वाढविली. त्यानंतर त्या व्यक्तीने महिलेला व्हॉट्सअॅप द्वारे संपर्क साधून महागडे गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. तसेच त्याचे कस्टम चार्जेस भरण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने ऑनलाइन पद्धतीने 6 लाख 34 हजार 999 रुपये पाठवले. मात्र, कोणतेच गिफ्ट महिलेला मिळाले नाही.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) तक्रार दिली.
त्यानंतर तो गुन्हा उत्तमनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख (PI Shabnam Shaikh) करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button