Pune Crime News | वानवडी येथील घटना एकतर्फी प्रेमातून महिलेचा विनयभंग करुन मागितली खंडणी, आरोपी गजाआड
पुणे : एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. तसेच पती आणि मुलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन 20 लाखांची खंडणी (Extortion Case) मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हा प्रकार ते शनिवार (दि.21) दरम्यान वानवडी येथे वेळोवेळी घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)
याबाबत 39 वर्षाच्या विवाहित महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी धमेंद्रकुमार परमानंद ठाकूर उर्फ छोटू (वय-43 रा. दरभंगा, जि. दरभंगा राज्य बिहार) याच्यावर आयपीसी 354, 354ड, 384, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे फिर्यादी यांच्यावर एकतर्फी प्रेम होते. आरोपीने फिर्यादी यांचे पती कामावर
गेल्यानंतर त्यांचा दुचाकी आणि कारमधून वेळोवेळी पाठलाग केला. तसेच घराचा दरवाजा व खिडकी वाजवून त्रास दिला.
फिर्यादी व त्यांच्या मुलांचे फोटो काढून ते पतिला पाठवले. तसेच माझ्यासोबत लग्न कर नाहितर 20 लाख रुपये दे,
पैसे दिले नाहीतर पती आणि मुलांना जिवे मारेल अशी धमकी देऊन खंडणीची (गणी केली.
आरोपीकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पोलिसांनी आरोपीवर विनयभंग व खंडणीचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) करीत आहेत.