2 लाखाचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छाप्यात शिंदवणेत दाेघांना अटक,
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. बी. शितोळे दुय्यम निरीक्षक आर डी. भोमले जवान के. आर. पावडे, के. एस. मुस्लापूरे, वाहन चालक ए. आर सिसोलेकर यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळे शिवार परिसरात अवैध दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे भरारी पथक क्र २ ने छापा टाकला. या छाप्यात सुमारे दोन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. या कारवाईत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या पाश्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क हवेली तालुक्यात गस्त घालत होते. गस्त घालत असताना पोलिसांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील काळे शिवार परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन अचानक छापा टाकला.या छाप्यात पोलिसांनी 4500 लिटर कच्चे रसायन व 350 लिटर दारू असा सुमारे १ लाख ९५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला आहे. तर दोन अज्ञात इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.हि कारवाई पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. बी. शितोळे दुय्यम निरीक्षक आर डी. भोमले जवान के. आर. पावडे, के. एस. मुस्लापूरे, वाहन चालक ए. आर सिसोलेकर यांच्या पथकाने केली आहे.