साईनाथ नगरमध्ये दारुच्या नशेत असणाऱ्या ,जावयाने सासूला संपवलं
जावयाने चाकूचे वार करुन सासूला संपवलं. या घटनेमुळे जानुवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विरार : बुधवारी दुपारी प्रशांत मद्यपान करून घरी आला होता. त्यावेळी त्याची पत्नी कामासाठी मुंबईला गेली होती. प्रशांतचा सासू लक्ष्मी बरोबर वाद झाला. याच वादातून प्रशांत खैरे याने सासूचे हात पाय बांधून मानेवर व पोटावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली. हत्या करून प्रशांत पळून जाण्याच्या तयारीत होता. घरात असलेल्या मुलांनी दरवाजाला कडी लावून प्रशांत याला आत डांबले. व आजूबाजूला आरडाओरडा करून नागरिकांना गोळा करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. विरार पोलीसांनी या आरोपीला अटक केली आहे.साईनाथ नगर येथील जानुवाडी परिसरात वामन निवास येथे लक्ष्मी खांबे (वय ६०) या मुलगी आणि नातवासोबत राहत होत्या. त्यांची मुलगी कल्पनाचे (वय 39) हिचे प्रशांत खैरे (वय 41) याच्याशी 2012 साली लग्न झाले होते. प्रशांत हा नेहमी दारु पिऊन कल्पनाला मारहाण करायचा. बुधवारी प्रशांत नेहमीप्रमाणे दारु पिऊन आला. त्यावेळी कल्पना घरी नव्हती. त्यावेळी दारुच्या नशेत असलेल्या प्रशांतने सासूसोबत वाद झाल्यानंतर लक्ष्मी खांबे यांना बेडरुममध्ये नेऊन तोंड, हात-पाय बांधले. यानंतर प्रशांतने चाकूने त्यांच्या मानेवर, पोटावर वार केले. यामध्ये लक्ष्मी खांबे यांचा मृ्त्यू झाला. या घटनेनंतर कल्पनाने विरार पोलीस ठाण्यात आईच्या हत्येप्रकरणी तक्रार देऊन पतीवर गुन्हा दाखल करायला लावला.