गुन्हेगारी

जीएसटी अधिक्षकाला पाच लाखांची लाच स्वीकारताना अटक; सीबीआयची कारवाई, शोध मोहिमेत ४२ लाख ७० हजार रुपयांची रोख जप्त

हेमंत कुमार असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते भिवंडी आयुक्तालयाचे अधिक्षक असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले.

मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केंद्रीय वस्तू कर सेवा कर विभागाच्या (जीएसटी) अधिक्षकाला पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोपाखाली अटक केली. हेमंत कुमार असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते भिवंडी आयुक्तालयाचे अधिक्षक असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले.

मुंबई व गाझियाबाद येथील कुमार यांचे कार्यालय व निवासस्थान येथे शोध मोहीम राबवण्यात आली. त्यात रोख ४२ लाख ७० हजार रुपये व मालमत्तेबाबतची कागदपत्रे सापडली. न्याायलाय समोर हजर केले असता त्यांना २१ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. एका खासगी व्यक्तीच्या तक्रारीवरून हेमंत कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना कुमारला रंगेहात पकडण्यात आल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले. कंपनीचे प्रलंबित जीएसटी प्रकरण सोडवण्यासाठी त्यांनी ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडीअंती त्यांनी १५ लाख रुपये स्वीकारण्यास होकार दिला. त्यातील पहिला पाच लाख रुपयांचा हफ्ता स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे सीबीआयने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button