राष्ट्रीय

इस्रायल-हमास युद्धाची भारतालाही चुकवावी लागणार किंमत, होणार हा परिणाम

वी दिल्ली | 25 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास यांच्या युद्ध पेटले आहे. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर मध्य-पूर्वेतील भू-राजकीय स्थिती बदलली आहे. हमासने हल्ला केल्यानंतर इस्रायलच्या अनेक नागरिकांनी ओलीस ठेवले आहे.

आणि हमासच्या तावडीतून आपल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी कोणतेही धाडस करु शकतो. त्यामुळे हमासचा नायनाट करणे हेच इस्रायलचे ध्येय बनले आहे. त्यामुळे या युद्धाचा दोन्ही देशांसह जगावर परिणाम होणार आहे. भारतावर देखील या युद्धाचे अनेक परिणाम होणार आहेत.

इस्रायलने हमासवर 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर प्रतिहल्ला सुरु केला आहे. या युद्धात आतापर्यंत 5 हजाराहून अधिक लोक ठार झाले आहेत. हमास आणि इस्रायलचे युद्ध केव्हा संपेल हे कोणी सांगू शकत नाही. येत्या दिवसात हे युद्ध आणखी गंभीर स्वरुप धारण करु शकेल असे म्हटले जात आहे. हे युद्ध लांबले तर त्याचा भारतावर मोठा गंभीर परिमाण आहे. चला पाहूयात भारतावर नेमका काय परिणाम होणार आहे.

दोन गटात जगाची विभागणी

इस्रायल आणि हमास युद्धामुळे जगाची दोन गटात फाळणी झाली आहे. एका बाजूला अमेरिका आणि युरोपातील अनेक मोठे देश इस्रायलच्या बाजूने या युद्धात उभे राहीले आहेत. तर दुसऱ्या बाजूला पॅलेस्टिनींच्या बाजूने अनेक इस्लामिक देश एकटवले आहेत. इराण आणि लेबनॉनसारख्या देशातील सक्रीय दहशतवादी संघटना पॅलेस्टिनी आणि हमासच्या बाजूने इस्रायलवर हल्ले करीत आहेत. त्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू त्यांच्याविरोधात अमेरिका आणि युरोपची युद्धात मदत मागू शकतात. त्यामुळे युद्धाचे स्वरुप आणखी विक्राळ होऊ शकते.

भारतावर होणार परिणाम

इस्रायल आणि लेबनॉन सीमेवर UNIFIL मध्ये भारताचे 900 सैनिक आहेत. जर युद्ध लांबले तर भारताच्या सैनिकांवर परिणाम होईल. भारताच्या अर्थव्यवस्थेवर युद्धाचा मोठा परिमाण होईल. दोन्ही देशांशी द्वीपक्षीय संबंध असल्याने भारताला तेथे मदत पाठवावी लागेल. भारतासह जगात चलनदरवाढीला सामोरे जावे लागेल. कच्च्या तेलाचे भाव अनेक देशांसह भारताला परवडणार नाहीत. त्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होतील. त्यामुळे भारतात गरजेच्या वस्तूचे भाव प्रचंड वाढतील. त्याचा सरळ परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button