संजय राऊतांचा हल्लाबोल, शिंदेंची शिवसेना, मनसे आणि अजित पवारांचा पक्ष सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेत,
ओढून ताणून बनवलेले हे पक्ष आहेत.एकनाथ शिंदे, अजित पवार, राज ठाकरे यांच्या पक्षाला जाण नाही, त्यांच्यामध्ये कसली अस्वस्थता असणार , असा टोला संजय राऊतांनी लगावला.
Mumbai Political : मनसेमध्ये अस्वस्थता आहे का? असा सवाल संजय राऊतांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी जोरदार हल्लाबोल करत टीकेचा बाण सोडला. खासदार संजय राऊतांनी राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. मनसे, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष सुपाऱ्या घेऊन निर्माण झाले आहेत, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे.मनसे, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा पक्ष हे सगळे सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत. भयातून निर्माण झालेले पक्ष आहेत. शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर हल्ले करा आणि त्यांना कमजोर करा, हे त्यांना काम दिलेले आहे. या तिन्ही पक्षांना यासाठी सुपाऱ्या दिल्या आहेत. या सुपार्या त्यांनी यासाठी स्वीकारल्या आहेत, कारण त्यांना सांगितलं आहे की नाही तर तुम्हाला आम्ही तुरुंगात पाठवू, असेही संजय राऊत म्हणाले.चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार यांच्या मेहेरबानीवर मोदी सरकार आहे, पण त्यांना मोठं मंत्रालय मिळालं नाही. भाजपने सर्व मोठी खाती स्वतःकडे ठेवली आहेत, असे संजय राऊत म्हणाले. आता एनडीए सरकार मध्ये आम्ही मोदींना प्रश्न विचारणार नाहीत. आम्ही चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना प्रश्न विचारणार आहोत, कारण या दोघांचा संयोग सरकार बनवण्यासाठी आहे. त्यांच्याशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकत नव्हते. नरेंद्र मोदी यांची सत्ता ही उधार सत्ता आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांची मेहरबानी राहील तोपर्यंत ही सत्ता राहील, असे संजय राऊत म्हणाले. चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार, पासवान आणि मांझी यांना काय मिळालं ? कोणते मोठे मंत्रालय मिळाले ? कोणाला काही मिळाले नाही, फक्त भाजपने आपापसात वाटून घेतला आहे. हे सरकार टिकणार नाही आजपासून कोणत्याच पक्षाला मोठे मंत्रिपद मिळाले नाही, असा दावा राऊतांनी केलाय.