पुणे

दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई! पुण्यात दोन तरुण ताब्यात, तिसरा पळाला

पुणे : पुण्यातून एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएस ने मोठी कारवाई केली आहे. एटीएसने पुण्यात दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. देशविरोधी कृत्याच्या संशयावरुन दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. पुणे पोलीस आणि एटीएस कडून ही संयुक्त करवाई करण्यात आली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच एक आरोपी फरार असल्याची देखील माहिती मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं. एटीएसला दोन्ही तरुणांच्या लॅपटॉपमध्ये संशयास्पद माहिती आढळली आहे. त्यामुळे देशविरोधी कारवाई केल्याच्या संशयावरून दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

संबंधित तीनही संशयित आरोपी हे पुण्यातील कोंडवा परिसरात वास्तव्यास आहेत. पण ते कोथरुडमध्ये सारखे ये-जा करायचे. कोथरुड येथून ते काहीतरी संशयास्पद काम करत असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यातून एटीएस आणि कोथरुड पोलीस यांनी संयुक्त विद्यमाने संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी एकजण फरार झाला. तर दोघांना ताब्यात घेण्यात आलं. आरोपींच्या लॅपटॉपमध्ये संशयास्पद डेटा आढळला असल्याची माहिती मिळत आहे.

पोलीस आणि एटीएसकडून दोन्ही आरोपींची चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. पण या प्रकरणी तपासातून नेमकी काय माहिती समोर आली ते समजू शकलेलं नाही. तसेच आरोपींना चौकशीनंतर सोडलं जातं की त्यांना अटक केली जाते, याबाबतही माहिती सध्या तरी समजू शकलेली नाही. पुण्यात एटीएसकडून याआधीदेखील अशीच कारवाई करण्यात आली होती. एटीसएसने गेल्यावर्षी मे महिन्यात पुण्यातून एका तरुणाला अटक केली होती. आरोपी हा लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. त्याला पुण्यातील दापोडी येथून अटक करण्यात आली होती. संबंधित तरुण हा सोशल मीडियाच्या माध्यमातून लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात आला होता. तो दहशतवद्यांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button